ताज्या घडामोडी

चालकाला धमकी देऊन ५० लाखांचा ट्रक चोरणाऱ्या दोन परप्रांतीयांना लोणी काळभोर पोलिसांची दोन तासांत अटक…

तुळशीराम घुसाळकर

पुणे (ता. हवेली) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत सिमेंट पोहोचवण्यासाठी आलेल्या चालकाला जीव मारण्याची धमकी देत तब्बल ५० लाख रुपये किंमतीचा ट्रक लंपास करण्यात आला होता. मात्र या धाडसी घटनेत आरोपींना अवघ्या दोन तासांत लोणी काळभोर पोलिसांनी इंदापुरातून जेरबंद करत ट्रकही जप्त केला.

आरोपींची माहिती पुढीलप्रमाणे…

या प्रकरणी फिर्यादी अनुजकुमार रामसुरत पांडे (वय २४, रा. सुलतानपुर, उत्तरप्रदेश) यांच्या तक्रारीवरून मल्लीकार्जुन शांताच्या अवंती (वय ३३, रा. गुलबर्गा, कर्नाटक) व अशोक शिवाप्पा राठोड (वय ३९, रा. विजापुर, कर्नाटक) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

घटनेचा उलगडा असा झाला…

फिर्यादी अनुज पांडे हे आपल्या भावाच्या मालकीच्या BR-24 GD-2008 या ट्रकवर चालक म्हणून काम करतात. ब्रोकर मल्लीकार्जुन अवंती याने त्यांना कर्नाटकातील कलबुर्गी येथून १ हजार पोत्यांचा सिमेंटचा माल पुण्यातील कदमवाकवस्ती येथे आणण्याची ऑर्डर दिली होती.

१० ऑगस्ट रोजी ते कलबुर्गीवरून निघाले; मात्र मार्गात ट्रक बिघडल्याने दोन दिवस उशीर झाला. अखेर १९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री कदमवाकवस्ती येथे पोहोचताच आरोपी अवंती व राठोड यांनी त्यांच्यावर हल्ला चढवून ट्रकची चावी हिसकावली, शिवीगाळ व जीव मारण्याची धमकी दिली. चालकाला जबरदस्ती ट्रकमध्ये बसवून नेत असताना एका ठिकाणी ट्रक थांबताच फिर्यादी पळून गेले व पोलिसांकडे धाव घेतली.

या घटनेवर पोलिसांची धडाकेबाज कारवाई…

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले. तपासदरम्यान पोलीस हवालदार रामहरी वणवे यांना खबऱ्याकडून आरोपी इंदापूरच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अवघ्या दोन तासांत आरोपींना अटक केली. सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी ट्रक कुठे लपवून ठेवला आहे ते सांगितले. पोलिसांनी तातडीने ट्रकही जप्त केला.

या घटनेत उल्लेखनीय कामगिरीत सहभागी अधिकारी…

ही कामगिरी पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, हडपसर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, तसेच पोलीस हवालदार रामहरी वणवे, गणेश सातपुते, सचिन सोनवणे, सुरज कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांचा सहभाग होता.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??