गुन्हे शाखा युनिट-६ ची धडक कारवाई; ४ लोखंडी कोयते जप्त…

तुळशीराम घुसाळकर
वाघोली (पुणे) : वाघोली परिसरात धारदार शस्त्रांसह फिरणाऱ्या ४ विधी संघर्षित बालकांना गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या जवळून ४ लोखंडी कोयते जप्त करण्यात आले असून वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (११ सप्टेंबर) रोजी गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक गस्त घालत असताना पोलिस अंमलदार नितीन धाडगे यांना गुप्त माहिती मिळाली की, चार नंबर, भावडी रोड, वाघोली येथे काही तरुण कोयते घेऊन थांबले आहेत. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले.
तपासात हे सर्व १७ वर्षे वयाचे विधी संघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले. यातील एका बालकावर यापूर्वी गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल असल्याचे देखील उघड झाले आहे.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम, पोलीस अंमलदार मदन कांबळे, गिरीश नाणेकर, प्रशांत कापुरे, सारंग दळे, निलेश साळवे, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे व बाळासाहेब तनपुरे यांनी केली.
Editer sunil thorat



