डॉ गजानन टिंगरे (इंदापूर)
पुणे (इंदापूर) : निमगांव केतकी येथुन शेत मालाचे विक्री करणारे व्यापारी नामे लखन चव्हाण व बापु बनकर यांच्याकडुन शेतक-यांच्या भाजीपालाचे पैसे बंद पाकिट व पावतीचे बंद पाकिट घेवुन पिटकेश्वर रोडने सराफवाडीकडे जात असताना निमगांव केतकी पिटकेश्वर रोडवरील कॅनॉल पास झाल्यानंतर भाजीपाला वाहतुक करण्यासाठी त्याच्याकडे असलेले पीकअप गाडीस ओव्हरटेक करुन मोटार सायकल पुढे गेली.
त्यानंतर साधारण ५०० मी अंतर पुढे गेलेनंतर काळया रंगाच्या मोटार सायकलवरील इसमाने त्यांची मोटार सायकल रोडवर आडवी उभी करून फिर्यादी यांची पीकअप गाडी थांबवून त्यास जबरदस्तीने खाली घेवुन त्यास मारहाण करुन तसेच चाकुने वार करुन त्याच्याकडे शेतक-यांच्या भाजीपाला विक्रीचे पैसाचे बंद पाकिट घेवून फॉरेस्टकडे निघुन गेले. फिर्यादीस थोड्या वेळानंतर रोडने जात असताना टेम्पो चालक मारुती शिवदास करे, गणपत देविदास पालखे, राजु श्रीमंत रासकर यांनी त्यास उपचार करीता दाखल केल्याचे माहिती सांगुन वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने गु. रजि. नंबर ५११/२०२४ बी.एन.एस १२६ (२), ३०९ (६).३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर सदर ठिकाणी गणेश बिरादार, अपर पोलीस अधिक्षक सो, बारामती विभाग तसेच, सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी साो, बारामती उपविभाग यांनी घटनास्थळी भेट देवून गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने योग्य त्या सुचना दिले होते. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रमारी अधिकारी श्री. राजकुमार डुणगे यांनी नियंत्रण कक्ष, पोलीस अधिक्षक कार्यालय, पुणे ग्रामीण येथे माहिती देवुन बारामती विभागामधील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिर्यादी यांनी सांगितलेल्या माहिती प्रमाणे वाहनाचा व अनोळखी इसमाचा शोध घेणेकामी नाकाबंदी लावण्यात आली होती.
सपोनि राजकुमार डुणगे यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देवून तसेच फिर्यादी उपचार घेत असलेले उपजिल्हा रुग्णालय, इंदापुर येथे भेट देवून फिर्यादीकडे विचापुस करुन सखोल चौकशी केली.इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी येथील पिटकेश्वर रोडकडे जाणारे रोडवरील सर्व सी.सी.टी.व्ही फुटेज तसेच निमगांव केतकी परिसरातील सर्व बीअर बार, पेट्रोल पंप याठिकाणावरील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले असता फिर्यादी यांनी सांगितले प्रमाणे फिर्यादी यांच्या वाहनाच्या पाठिमागे किंवा पुढे कोणतेही मोटार सायकल ट्रीपल सीट गेल्याचे दिसुन आले नाही. गुन्हा घडले नंतर घटनेच्या वेळी फिर्यादीस चाकुने वार केल्याचे सांगुन त्यात त्याचे टिशर्ट फाटल्याचे सांगत होते. परंतु त्याचे आतिल चनियन वरती वार झाल्याचे व कट झाल्याचे निशान दिसुन आले नाही. तसेच त्याच्या संपूर्ण शरिरावर धक्काबुक्की किंवा मारहाण झाल्याचे दिसुन आले नाही. त्यामुळे फिर्यादीवरच तपासामध्ये संशय जास्त निर्माण झाला होता. तसेच गोपनीय माहितीदार यांचेकडे फिर्यादीस उपचाराकामी दाखल करणारे इसमांचा यामध्ये सहभाग असल्याची माहिती मिळाल्याने इसम नामे १. मारुती शिवदास करे, २. गणपत देविदास पालखे, ३. राजु श्रीमंत रासकर रा. सर्व सराफवाडी, ता. इंदापुर, जि. पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस करत असताना त्यांनी फिर्यादीस खोटा जबरी चोरीचा बनाव करुन शेतकरी यांचे आलेले पैसे स्वतःच्या उपयोगासाठी ठेवण्याच्या उद्देशाने कट रचुन खोटी फिर्याद दिल्याची कबुली दिली. त्यानंतर दाखल गुन्हयाचे फिर्यादी नामे गुणवंत पोपट रासकर, तसेच मारुती शिवदास करे, गणपत देविदास पालखे, राजु श्रीमंत रासकर यांना सदर गुन्हयात अटक केली असुन तपासा दरम्यान त्यांच्याकडुन शेतक-यांचे शेतमालाचे ४२,४१०/- रुपये जप्त करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास हा पोलीस उप-निरीक्षक विजय टेळकीकर हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही पंकज देशमुख, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण,गणेश बिरादार, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग,सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, तसचे पोलीस उप-निरीक्षक विजय टेळकीकर, पोलीस हवालदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, दत्तात्रय चांदणे, दादासाहेब डोईफोडे, पोलीस नाईक जगदीश चौधर, पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव, अजित राऊत, रणजित देवकर यांनी पार पाडली आहे. त्याबद्दल वरिष्ठ अधिकारी यांनी गुन्हा उघडकीस आणलेबाचत पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा