क्राईम न्युज

शाळेच्या बसचालकाची बेदरकार कृत्ये ; टेम्पोचालकाला मारहाण, वाहनाची तोडफोड… पाहा व्हिडिओ…

हडपसर : (दि. ९ ऑक्टोबर) मगरपट्टा ब्रिज परिसरात शाळेच्या बसचालकाने बेदरकारपणे वाहन चालवून टेम्पो चालकाला शिवीगाळ व मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 874/2025 असा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांच्या माहितीनुसार, दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास स्कुल बस (क्र. एम.एच.१४ एम.एम. ९८३७) चालवणारा सुरज रमेश पाटील (वय ३२, रा. पिंपरी चिंचवड) याने मगरपट्टा ब्रिज जवळ टेम्पो (क्र. एम.एच.१४ के.ऐ. ०९१०) चालकास शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.

याच दरम्यान आरोपीने बसमधील लोखंडी टामीने टेम्पोचे समोरील काच फोडून नुकसान केले व सार्वजनिक रस्त्यावर दहशत निर्माण केली.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध BNS कलम 281, 351(2), 352, 324(2), 37(1), 135, 3, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय भोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून आरोपी सुरज पाटीलला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Editer Sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??