महाराष्ट्र

टोलनाका बंद झालेला त्याचा सांगाडा अद्याप जैसे थे ; किती जणांचा बळी घेणार.

पुणे (हवेली) : कवडीपाट टोल नाक्यावर (ता.३) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने चाललेल्या टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर बंद असलेल्या टोलनाक्यावरील डिव्हायडरला धडकल्याने झालेल्या अपघातात टँकर चालकाचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात गुरजंट सुरजित सिंग (वय ३४ ,रा. दगीपुर गरबी ता. सरहली जि.तरणतारण, पंजाब) हे मृत्युमुखी पडले आहेत. सदर घटना रविवार (२ फेब्रुवारी) रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सहा वर्षांपूर्वी (मार्च २०१९) मध्ये कवडीपाट टोलनाका बंद झालेला आहे. परंतु त्याचा सांगाडा अद्याप जैसे थे आहे. याठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे अजून किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार? बंद पडलेल्या टोलनाक्याचा सांगाडा कधी निघणार? असा यक्षप्रश्न नागरिक विचारत आहेत.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरजंट सिंग हे टँकर घेऊन सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. ते कवडीपाट टोलनाक्याजवळ आले त्यावेळी टँकरचा वेग जास्त होता. त्यामुळे त्यांचा टँकरवरील ताबा सुटला त्यामुळे टँकर टोलनाक्याच्या डिव्हायडर व खांबला धडकला. या अपघातात टँकर चालक सिंग हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्यास गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांना तात्काळ लोणी काळभोर येथील एका दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गुरजंट सिंग यांनी त्यांच्या ताब्यातील टँकर हा वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून हयगयीने व निष्काळजीपणे चालवून ते स्वतःच्या मृत्युस कारणीभुत झाले, अशी फिर्याद पोलीस नाईक दिगंबर रामदास जगताप यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने दिली आहे.

पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.

आर्यन टोलरोड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीपाट व दौंड तालुक्यातील कासुर्डी या भागातील रस्त्याचे काम ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वावर केले होते. चौदा वर्ष या कंपनीकडून टोलवसुली सुरु होती. त्याची मुदत मार्च २०१९ मध्ये संपल्यावर येथील टोलवसुली बंद झाली. सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही हे दोन्ही टोलनाके काढण्यात आले नसून त्याचे सांगाडे अद्यापही महामार्गावरच आहेत. बंद पडलेल्या या दोन्ही टोलनाक्यांना धडकून वारंवार लहान-मोठे अपघात होत आहेत. अपघातात अनेक जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे, तर काही जणांना आपले कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहे.

या टोलनाक्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत फ्लेक्स लावले जातात. हे फ्लेक्स धोकादायकरीत्या महामार्गावर वारंवार लटकतात अथवा पडतात. त्यामुळे बंद पडलेल्या या दोन्ही टोलनाक्याचा सांगाडा लवकरात लवकर काढावा, अशी आग्रही मागणी नागरिकांकडून होत आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??