
लोणी काळभोर : पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे सोमवार दि. ५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता ज्येष्ठ नागरिक, महिला दक्षता कमिटी, पोलीस पाटील व शांतता कमिटी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत पोलीस दलाची स्थापना, त्यामागील उद्दिष्टे तसेच पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी नागरिकांच्या विविध अडचणी, समस्या व सूचना जाणून घेण्यात आल्या.
बैठकीदरम्यान उपस्थित ज्येष्ठ नागरिक सदस्यांनी पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस दलास शुभेच्छा देत, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून आभार मानले.
या बैठकीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार रवी आहेर, गोपनीय अंमलदार तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला दक्षता कमिटी, पोलीस पाटील व शांतता कमिटीचे सुमारे ४० ते ५० सदस्य उपस्थित होते.
पोलीस व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली.
Editer sunil thorat






