
डॉ गजानन टिंगरे
जंक्शन–आनंदनगर (ता. इंदापूर) : रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी जंक्शन–आनंदनगर येथे पौष पौर्णिमा सोहळा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम आनंदनगर परिसरातील सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यासाठी अकोला येथून आलेले पूज्य भदंत निर्वाणा यांनी उपस्थितांना धम्मदेसना देत बुद्धाच्या करुणा, प्रज्ञा व मैत्रीचा संदेश दिला. तसेच “चला जाऊ बुद्धाच्या घरी” हा संदेश घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर प्रबोधनाचे कार्य करणारे आयु. प्रबुद्ध साठे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सामाजिक एकता, समता व शिक्षणाचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाचे नियोजन आयु. मिलिंद मिसाळ, आयु. चंद्रकांत कांबळे, आयु. पुंडलिक सोनवणे, आयु. अलंकार पोळ, आयु. दीपक लोंढे, आयु. केतन मिसाळ व आयु. जतिन वाघमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयु. सूर्यकांत साबळे, आयु. संतोष बनसोडे, आयु. प्रवीण धाइंजे, आयु. योगेश करे, आयु. अण्णा भोसले, आयु. सुनील शिंदे, आयु. स्वरूप लोंढे, आयु. विजय बनसोडे, शास्त्रज्ञ आयु. अनिल लोंढे, आयु. कसबे, आयु. मेजर गोविंद कांबळे, आयु. धांडोरे, आयु. गणेश झोडगे, आयु. पालेकर, आयु. मेजर गवळी, आयु. सुमित मोटे, आयु. स्वप्निल सरतापे, आयु. आनंद बनसोडे, सेवानिवृत्त प्राचार्य रमेश लोंढे, सेवानिवृत्त प्राचार्य सर्वगोड, सेवानिवृत्त प्राचार्य छगन साबळे, आयु. सचिन कदम, आयु. आनंदा कांबळे, आयु. पप्पू लोंढे, आयु. मेजर सचिन साबळे आदी बौद्ध बांधवांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक व मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये माजी पंचायत समिती सदस्य डॉ. संजीव लोंढे, सेवानिवृत्त प्राचार्य करे, आयु. सुरेश पोळ, आयु. अशोक लोंढे, आयु. प्रवीण कसबे, आयु. मंगेश लोंढे, आयु. नाना लोंढे, आयु. सोमनाथ लोंढे, आयु. भिमराव साबळे, आयु. नानासाहेब शिंदे, आयु. मिसाळ, आयु. निलेश खरात यांच्यासह विविध तालुक्यांतून व गावांतून आलेले बौद्ध बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात धम्म रॅलीने करण्यात आली. त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. एकूणच पौष पौर्णिमा सोहळा व सावित्रीबाई फुले जयंतीचा हा कार्यक्रम सामाजिक प्रबोधन, एकता व बंधुभावाचा संदेश देणारा ठरला.
Editer sunil thorat



