ताज्या घडामोडी

एमआयटी-एडीटी विद्यापीठाला ‘डास्का’ मानांकन; एआय-डेटा सायन्स अभ्यासक्रमांना आंतरराष्ट्रीय दर्जा…

लोणी काळभोर (हवेली) : MIT Art, Design and Technology University (एमआयटी-एडीटी) विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची झेप घेत ‘डास्का’चे (Data Science Council of America) मानांकन प्राप्त केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा सायन्स क्षेत्रातील अभ्यासक्रमांसाठी हे आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरण्याचा मान एमआयटी-एडीटीला मिळाला आहे.

हे मानांकन विद्यापीठाच्या संगणक शास्त्र, अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान शाखेतील ११ पदवी, ३ पदव्युत्तर तसेच पीएच.डी. स्तरावरील अभ्यासक्रमांना प्रदान करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा अ‍ॅनालिटिक्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन आणि इंटेलिजंट सिस्टिम्स या अत्याधुनिक तंत्रज्ञान विषयांचा या अभ्यासक्रमांमध्ये समावेश आहे.

‘डास्का’ मानांकन हे जागतिक स्तरावर उच्च दर्जाची अभ्यासक्रम रचना, शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योगाभिमुखता सिद्ध करणाऱ्या संस्थांनाच दिले जाते. डेटा-आधारित अर्थव्यवस्थेच्या वाढत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना अद्ययावत व कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्याची क्षमता असलेल्या संस्थांना हे मानांकन बहाल केले जाते.

या मानांकनामुळे ‘वर्ल्ड डेटा सायन्स अँड एआय इनिशिएटिव्ह’ (WDSAI) अंतर्गत जागतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी विद्यापीठाला मिळणार आहे. तसेच प्राध्यापक प्रशिक्षण, संशोधन सहकार्य आणि ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारणीला चालना मिळणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.

विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष Dr. Vishwanath D. Karad यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांचा समन्वय साधणारी शिक्षण प्रणाली उभारण्याचा विद्यापीठाचा सातत्यपूर्ण प्रयत्न असून, या मानांकनामुळे त्या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे. भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे कौशल्याधारित शिक्षण देण्याचा आमचा उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती Dr. Mangesh Karad यांनी ही कामगिरी शैक्षणिक उत्कृष्टता आणि नवोपक्रमाच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. मिळालेल्या या मानांकनामुळे विद्यापीठाची जबाबदारी आणखी वाढली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या यशासाठी कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., अधिष्ठाता प्रा. डॉ. विरेंद्र शेटे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे तसेच डॉ. गणेश पाठक, डॉ. श्रद्धा फणसळकर आणि डॉ. राकेश सिद्धेश्वर यांचे विद्यापीठ व्यवस्थापनाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??