आरोग्य
पुण्यात HMPV रोखण्यासाठी खबरदारीचे आदेश..
हॉस्पिटलमध्ये बेड राखीव ठेवण्याच्या हालचालींना वेग ;आरोग्य विभाग अलर्ट...

पुणे : जगभरात २०२० मध्ये थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) वेगाने पसरत आहे. भारतात देखील आतापर्यंत तीन जणांना HMPV व्हायरसची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्नाटकमध्ये सुरुवातील दोन जणांना HMPV ची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आता गुजरातमधील 2 वर्षांच्या मुलाला HMPV व्हायरसची लागण झाली आहे. दरम्यान, आरोग्य सेवा संचालनालय, पुणे यांनी दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी याबाबत एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, याबाबतची माहिती मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
परिणामी संभाव्य आजाराचा धोका लक्ष्यात घेता HMPV रोखण्यासाठी राज्यासह पुण्यात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पुण्यातील हॉस्पिटल बेड राखीव ठेवण्याच्या हालचालीला आता वेग आला असून आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आल्याचे चित्र आहे.
नायडू हॉस्पिटलमध्ये ३५० बेडची सोय
ह्युमनमेटाप्युमो व्हायरस (HMPV) संदर्भात महाराष्ट्र आरोग्य विभागाने काही सूचना जाहीर केल्या आहेत. त्यात नागरिकांनी कशी काळजी घ्यावी या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पुण्यात या व्हायरस संदर्भात खबरदारीसाठी उपाययोजना करण्यात येत आहे. पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये ३५० बेडची सोय करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र महापालिका प्रशासन नायडू हॉस्पिटलला देणार असल्याची माहिती आहे. राज्यात अजून एकाही रुग्ण नसला तरी महापालिका खबरदारीचा उपाय म्हणून बेड राखीव ठेवण्यासाठी खबरदारी घेत आहे.
डॉ. रवी गोडसे यांचा सल्ला हे करायचे दक्षता घ्या
जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोड आणि नाक रुमाल किया टिश्यू पेपरने झाका.
साक्य आणि पाणी किवा अल्कोहोल आधारित संनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा,
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.
शक्यतो हे करू नये
हस्तांदोलन
टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुस्र्वांपर
आजारी लोकाशी जवळचा संपर्क
डोळे, नाक आणि तोडाला वारंवार स्पर्श करणे.
एचएमपीव्ही व्हायरसचा भारताला फारसा धोका नाही- डॉ. रवी गोडसे
एचएमपीव्ही व्हायरसमुळे भारताला फारसा धोका नसल्याचे साथीच्या आजारांचे तज्ज्ञ डॉ. रवी गोडसे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भारतीयांना काळजी करण्याची गरज नाही. सध्या चीनमधील लोक मास्क घालून फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र, चीनमध्ये प्रदूषणाची समस्या असल्याने तेथील लोक नेहमीच मास्क घालून फिरतात. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. एचएमपीव्ही व्हायरस हा अत्यंत साधा आहे. तो अगदी कमी किंवा खूप जास्त वय असलेल्या व्यक्तींना होतो. विशेषत: लहान बालकांना एचएमपीव्ही व्हायरसची लागण होण्याची धोका असतो. मात्र, यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता खूपच दुर्मिळ आहे, असे डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले.
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
👉🏻”द पाॅईंट न्युज 24″- https://thepointnews24.in/
👉🏻फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
👉🏻ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
👉🏻इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
👉🏻डेलीहंट पेज – https://profile.dailyhunt.in/sunil24
👉🏻वाॅटसअप ग्रुपला अॅड होण्यासाठी – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj लिंकवर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.



