शिक्षण

प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड शिष्यवृत्ती योजना जाहीर..

पुणे : माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातर्फे सर्व बोर्डाच्‍या दहावीच्‍या हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड शिष्यवृत्ती’ योजना जाहीर करण्यात आली आहे.

या वर्षी ही परीक्षा सोमवार दि. २७ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षेचे समन्वयक डॉ. एस. एन. पठाण आणि महासचिव प्रा. स्वाती कराड- चाटे यांनी दिली.

परीक्षा दोन भागांमध्ये म्हणजे पहिला पेपर स. ११ ते दुपारी १ आणि दुसरा पेपर दुपारी ३ ते ५ वेळेत होईल. निकाल ३ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. ही परीक्षा इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या दहावीच्‍या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील कोकण (मुंबईसह), उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या पाच विभागांत २७ जानेवारी रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. विभागातील पहिल्या नऊ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती २ वर्षांसाठी असेल.

यशस्वी विद्यार्थ्यांतील पहिल्या क्रमांकास प्रतिवर्ष २५ हजार, तर दुसऱ्या क्रमांकास २० हजार, तिसऱ्या क्रमांकास १५ हजार, चौथ्या क्रमांकास दहा हजार पारितोषिक दिले जाणार आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी १० वी आणि ११ वीमध्ये किमान ७० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे; अन्यथा शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल.

विद्यार्थ्यास मुख्याध्यापकांची शिफारस असणे आवश्यक आहे. ही परीक्षा घेणार्‍या प्रत्येक शाळेतर्फे त्या केंद्रावर किमान ३० विद्यार्थी बसणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी नोंदणी फी नाममात्र १०० रुपये आहे. सविस्‍तर माहिती https://wpcvalue-education.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

👉🏻”द पाॅईंट न्युज 24″- https://thepointnews24.in/
👉🏻फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
👉🏻ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
👉🏻इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
👉🏻डेलीहंट पेज – https://profile.dailyhunt.in/sunil24
👉🏻वाॅटसअप ग्रुपला अॅड होण्यासाठी – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj लिंकवर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??