ताज्या घडामोडी
महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन ; मांजरी बुद्रुक

पुणे (हडपसर) : पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग व राणी लक्ष्मीबाई योजने अंतर्गत मांजरी बुद्रुक येथे दिव्यांग कल्याण केंद्र महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
हे आरोग्य शिबिर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, चंद्रकांत पाटील यांच्या सौजन्याने समर्थ युवा फौंडेशनचे राजेश पांडे यांच्या माध्यमातून समाजातील गरीब गरजू बचत गटातील महिलांना यांचा लाभ मिळाला.
यावेळी शासन नियुक्त नगरसेवक पुणे मनपा बाळासाहेब वसंत घुले, जनाधार दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय ननवरे, ओंकार अंकुशे, समूह संघटिका पूनम गायकवाड नगर वस्ती सेंटर पल्लवी गायकवाड व गीता कांबळे. इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये महिलांचे आरोग्य तपासणीमध्ये मेमोग्राफी, शुगर टेस्ट, बीपी, सी बी सी, कोलेस्ट्रॉल टेस्ट इत्यादी टेस्ट चेक करण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये १३० पेक्षा जास्त महिलांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
👉🏻”द पाॅईंट न्युज 24″- https://thepointnews24.in/
👉🏻फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
👉🏻ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
👉🏻इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
👉🏻डेलीहंट पेज – https://profile.dailyhunt.in/sunil24
👉🏻वाॅटसअप ग्रुपला अॅड होण्यासाठी – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj लिंकवर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.





