वाहन चोरी करणार्यास अटक, दोन गुन्हे, तीन वाहने जप्त,; १ लाख ४० हजार हस्तगत..कवडीपाठ

पुणे (हवेली) : लोणी काळभोर पोलीस स्टेशन अज्ञात चोराचा व चोरीस गेले पॅगो टेम्पोचा शोध घेत असताना पोलीसांनी एका सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले असून त्यांचेकडून १ लाख ४० हजार रुपये किंमतीची चोरीची वाहने हस्तगत केली आहेत.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अज्ञात चोराचा व चोरीस गेले पॅगो टेम्पो क्रमांक एमएच १२ डिजी ३९६२ या निळया रंगाचे वाहनाचा शोध घेत असता लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार शैलेश कुदळे व योगेश पाटील यांना मिळालेले बातमी वरुन सदर वाहन कवडी पाट टोलनाक्याजवळील ओढयानजीक सागर प्रकाश जाधव (रा. शोभा मेमाणे यांचे घरात भाडयाने आई माता मंदिरा जवळ, कवडी माळ, कदमवाक वस्ती, ता. हवेली जि. पुणे) याने चोरी केले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार सागर जाधव यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असुन त्याचेकडे केलेल्या चौकशीत लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन गुन्हे उघडकिस आणलेले आहेत. त्यांचेकडून टाटा कंपणीचा ४०७ मॉडेलचा टेम्पो क्रमांक एमएच ०६.एजी २५७९, पॅगो अॅपे टेम्पो क्रमांक एमएच १२ डीजी ३९६२, महिंद्रा आल्फा क्रमांक एमएच १२ डी टी ५१२० अशी एकुण १ लाख ४० हजार रुपये किंमतीची चोरीची वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगीरी पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार सातपुते, देविकर, शिंदे, नागलोत, वाघमोडे, बनकर, पोलीस अंमलदार बाजीराव वीर, शैलेश कुदळे, योगेश पाटील, राहुल कर्डीले, प्रदिप गाडे, चक्रधर शिरगीरे यांचे पथकाने केली आहे.



