
हडपसर (पुणे) : मराठी भाषेचे वैभव जतन व संवर्धन व्हावे या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रात “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा केला जातो. या पंधरवड्यानिमित्त जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, हडपसर, पुणे येथील ग्रंथालय विभाग व विद्यार्थ्यांच्या वतीने शुक्रवार, दि. 30 जानेवारी 2026 रोजी ग्रंथप्रदर्शन व वाचकवीर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जेएसपीएम इम्पीरियल अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण शेंडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ते कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी प्रास्ताविकातून मराठी भाषेचे महत्त्व व वाचन संस्कृतीची गरज अधोरेखित केली.
मुख्य अतिथी डॉ. लक्ष्मण शेंडगे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपली संस्कृती, ओळख व अस्मिता असल्याचे सांगितले. तरुण पिढीने मराठी वाचनाची सवय लावून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उत्कृष्ट वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सर्वोत्कृष्ट वाचक’ पुरस्कार देऊन प्रमाणपत्रांनी सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून ग्रंथपाल विवेक थोरात यांनी जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. अनुराधा पाटील, प्रा. रविराज जाधव, प्रा. निकिता कोलते, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. चेतन मामडगे, प्रा. तनुजा काशिद तसेच प्रियंका महाजन, ऋतुजा दाते, स्वप्नाली सावंत, स्वाती माकोने, रूपाली शिंदे, प्रतिक्षा थोरात, सुरवसे, आकांक्षा मावशी आणि पांडुरंग पवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा व वाचन संस्कृतीविषयी सकारात्मक जागृती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Editer sunil thorat





