महाराष्ट्रसामाजिक

आयटीआर फाईल कशासाठी, काय फायदा होतो.? सविस्तर माहिती पहा.

आयटीआरचे मिळतील चकित करणारे फायदे! तुम्ही कधी विचार देखील केला नसेल..

पुणे : इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयकर भरणे हे खूप गरजेचे असते व हे प्रत्येक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे. तसेच अशा पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे फायदे देखील बऱ्याच प्रकारचे मिळतात. आपल्याला माहित आहे की, इन्कम टॅक्स स्लॅबच्या अंतर्गत जे येतात त्यांना कर म्हणजेच आयकर भरावा लागतो.

       परंतु यामध्ये काही व्यक्तींना मात्र आयकर विवरण पत्र भरण्यापासून सूट देखील दिलेली आहे. म्हणजेच तुमचे उत्पन्न जर प्राप्तिकर सवलतीच्या मर्यादेच्या आत येत असेल तर तुम्हाला आयटीआय भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. परंतु तुमचे उत्पन्न जर कर सवलतीच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला आयटीआर भरणे गरजेचे असते. दुसरे म्हणजे आयकर विभागाच्या माध्यमातून कलम १७४ पी अंतर्गत ७५ वर्षांवरील व्यक्तींना आयटीआर भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे.

        परंतु यामध्ये काही अटींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक हे मागील वर्षी भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच त्यांचे उत्पन्न पेन्शनचे उत्पन्न आणि जर त्यांनी बँकेत एफडी केली असेल तर त्या एफडीतून मिळणारे व्याज यातून मिळणे आवश्यक आहे.

आयटीआर भरल्याने मिळतात अनेक फायदे

        तुम्ही इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये म्हणजेच आयकर कक्षेत येत नसाल तरी देखील तुम्ही आयकर विवरण पत्र भरणे सुरू ठेवले तर ते तुमच्यासाठी एक कायदेशीर कागदपत्र तयार होते व कुठल्याही प्रकारचे कर्ज घेताना याचा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. तुम्ही नोकरी करत असाल तर आयटीआर नक्कीच भरावा. जरी तुम्ही टॅक्स स्लॅबमध्ये येत नसाल तरी देखील. कारण यामुळे

       तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळतात.

१- उत्पन्नाचा पुरावा म्हणून- इन्कम टॅक्स रिटर्न भरणे म्हणजे तुम्ही पैसा कमावतात याचा हा मोठा पुरावा असतो. म्हणजेच एखाद्या बँकेला किंवा इतरत्र तुम्हाला जर तुम्ही पैसे कमावता हे दाखवायचे असेल तर आयटीआर फाईल तुमच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून काम करते.

२- कर्ज पटकन मंजूर होते- तुम्ही जर पर्सनल लोन किंवा वाहन कर्ज, होमलोन यासारखे कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमचा इन्कम टॅक्स रिटर्नचा पुरावा तुम्हाला खूप फायद्याचा ठरतो. या माध्यमातून बँकेला कळते की तुम्ही पैसे कमवतात व तुम्ही कर्जाची परतफेड देखील करू शकतात.

३- व्हिसासाठी आयटीआर गरजेचा- तुम्हाला जर परदेशात प्रवास करायचा असेल व याकरिता तुम्ही व्हिसा करिता अर्ज करत असाल तर त्या ठिकाणी आयटीआर फायलिंग हा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो.

या माध्यमातून तुमची आर्थिक स्थिती काय आहे हे दिसून येते. तसेच जे व्यक्ती स्वतः कमावत नाही त्यांच्यासाठी त्यांच्या पालकांच्या आयटीआरची प्रत दिली जाऊ शकते व यामुळे व्हिसा ताबडतोब मंजूर होण्यास मदत होते.

४- व्यवसाय सुरू करण्यासाठी फायदेशीर- तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल व ज्यामध्ये तुम्हाला सरकारी विभागाकडून कंत्राट घ्यायचे असेल तर तुमची आयटीआरची गरज यावेळेस तुम्हाला भासते. तुम्हाला जर कुठल्याही सरकारी विभागाकडून कंत्राट मिळवायचे असेल तर पाच वर्षाचा आयटीआर असणे आवश्यक असते.

५- मोठ्या रकमेच्या विमा पॉलिसीमध्ये फायद्याचा- समजा तुम्ही जर ५० लाख किंवा एक करोड रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची विमा पॉलिसी खरेदी करत असाल तर तेव्हा तुम्हाला आयटीआर पावती दाखवावी लागते व ते गरजेचे आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??