कदमवाकवस्ती, कुंजीरवाडीत पोलिसांची कारवाई; महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा, हातभट्टी धंद्यांना आळा…
हवेली तालुक्यात हातभट्टी अड्ड्यांवर पोलिसांची धाड ; नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले..

कदमवाकवस्ती/कुंजीरवाडी (ता. हवेली) : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती व कुंजीरवाडी परिसरात अवैध हातभट्टी दारूविक्री करणाऱ्यांवर लोणी काळभोर पोलिसांनी बुधवारी (दि. 3) मोठी धडक कारवाई केली. एकाच दिवशी सलग तीन छापे घालत पोलिसांनी महिलेसह तिघांना पकडले. या कारवाईत एकूण 74 लिटर हातभट्टी दारू जप्त करून सुमारे 7 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये –
नुतन योगेश लोंढे (28, कुंजीरवाडी, पुणे)
बजीरंग भरत घोलप (30, कुंजीरवाडी, मूळ लातूर)
वैशाली रवींद्र झेंडे (38, इंदिरानगर, पुणे) यांचा समावेश आहे.
कारवाईचा पुढीलप्रमाणे तपशील…
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांची गस्त सुरू असताना पोलिसांना खबऱ्यामार्फत हातभट्टी विक्रीबाबत माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम कदमवाकवस्ती येथील इंदिरानगर परिसरात छापा टाकला. तेव्हा वैशाली झेंडे या बेकायदा हातभट्टी विक्री करताना रंगेहात सापडल्या. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तब्बल 34 लिटर दारू जप्त केली.
यानंतर पोलिसांनी कुंजीरवाडीमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालून नुतन लोंढे व बजीरंग घोलप यांना पकडले. त्यांच्या ताब्यातून 40 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली.
या कारवाईत पोलीसांकडून एकूण जप्ती…
या तीन छाप्यांतून पोलिसांनी 74 लिटर दारू (मुद्देमाल किंमत 7,500 रुपये) जप्त केली असून, आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अॅक्ट कलम 65 (ई) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
कदमवाकवस्ती, कुंजीरवाडीतील नागरिकांचा प्रतिसाद…
या कारवाईनंतर परिसरातील अवैध दारूधंद्यांवर मोठा आळा बसला आहे. नागरिकांनी पोलिसांचे भरभरून कौतुक करत “पोलिसांनी धाडसी पाऊल उचलल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
पोलिसांच्या कारवाईसाठी टीम…
ही कामगिरी उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक पूजा माळी, हवालदार राणी खामकर, वैशाली नागवडे, विलास शिंदे, रामहरी वणवे, पोलीस अंमलदार शैलेश कुदळे, प्रवीण दडस, प्रदीप गाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संयुक्तपणे केली.
Editer sunil thorat



