ताज्या घडामोडी

शासन आणि लोकप्रतिनिधी मिळून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु ; उपमुख्यमंत्री अजित पवार…

महा जनता दरबारात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; ३ हजार १२५ अर्ज प्राप्त...

पुणे (हडपसर) : शासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यामध्ये थेट संवाद साधून समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने मांजरी रोड, हडपसर येथील नेताजी सुभाष मंगल कार्यालयात आयोजित महा जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दरम्यान नागरिकांनी विविध विभागासमोर थेट आपल्या समस्या मांडल्या. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या समस्यांची गंभीर दखल घेत कार्यवाहीसाठी आश्वासन दिले.

या कार्यक्रमाला आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, मनपा अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या…

या महा जनता दरबारात पाणीपुरवठा, रस्ते, मलनिस्सारण, विद्युतपुरवठा, वाहतूक कोंडी, गृह निर्माण संस्थांसाठी सुविधा जागा, स्मशानभूमी-दफनभूमी, रिंगरोड, भूसंपादन, रेल्वेपूल आदी महत्त्वाच्या प्रश्नांबाबत नागरिकांनी निवेदन दिली. या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून जिल्हास्तर व मंत्रालय स्तरावर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

ते म्हणाले, “नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. हडपसर परिसरातील काही ठिकाणी तातडीने प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मनपा आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त प्रत्यक्ष भेटी देऊन उपाययोजना करतील. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आधुनिक उपाययोजना केल्या जातील. मात्र नागरिकांनीही शिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.”

महा जनता दरबारातील आकडेवारी…

या महा जनता दरबारात विविध शासकीय विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. नागरिकांकडून एकूण ३ हजार १२५ अर्ज प्राप्त झाले. त्यात प्रमुख समस्या पुढीलप्रमाणे –

पाणीपुरवठा : ६१९

समाजकल्याण : २६९

विद्युत : २२५

महसूल : २१८

घनकचरा व्यवस्थापन : २११

इमारत परवानगी : १७१

सिटी सर्वे : १५९

पोलीस विभाग : १५६

वाहतूक विभाग : १५५

सहकार (गृह निर्माण संस्था) : १५०

आरोग्य : १५९

मालमत्ता कर : ११६

मुद्रांक व नोंदणी : ८४

पीएमआरडीए : ७६

झोपडपट्टी पुनर्वसन : ५८

महावितरण : ५८

कचरा व स्वच्छता : ५१

परिवहन : ४०

पीएमपीएल : ३८

जमीन अतिक्रमण : ३३

म्हाडा : ३०

धर्मादाय उपायुक्त कार्यालय : २३

वाहन संदर्भात : ६

मालमत्ता पत्रिका (सिटी सर्वे) : ३

कायदा व सुव्यवस्था : २

इतर : २५

नागरिकांनी समाधान व्यक्त…

या दरम्यान नागरिकांनी शासन व लोकप्रतिनिधींना थेट आपली मते व समस्या मांडण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त केले. अजित पवार यांनी दिलेल्या आश्वासनामुळे नागरिकांमध्ये विश्वास आणि अपेक्षा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??