मजुराला बांबूने मारहाण ; दोघांवर गुन्हा दाखल…

तुळशीराम घुसाळकर
थेऊर (ता. हवेली) : “तू येथे काम करायचे नाही” असे म्हणून प्लॉटिंगमध्ये मजुरी करणाऱ्या मजुराला दोघांनी बांबूने मारहाण केली. या हल्ल्यात मजूर गंभीर जखमी झाला असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील काळे वस्ती येथे घडली.
जखमी मजुराचे नाव सागर शंकर इंगळे (वय ४०, रा. काळे वस्ती, थेऊर) असे आहे. तर गुन्हा दाखल झालेल्यांची नावे समीर पाचोरकर व मनिषा पाचोरकर (रा. थेऊर) अशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इंगळे हे प्लॉटिंगमध्ये काम करत असताना पाचोरकर दाम्पत्य तेथे आले. त्यांनी इंगळे यांना “तू येथे काम करायचे नाही” असे म्हणत शिवीगाळ करून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. इंगळे पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना मनीषा यांनी त्यांना मागून पकडले आणि त्यानंतर समीर यांनी बाजूला पडलेल्या बांबूने त्यांच्या डाव्या हातावर व पायावर जोरदार मारहाण केली. यात इंगळे गंभीर जखमी झाले.
जखमी इंगळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर, समीर व मनीषा पाचोरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
Editer sunil thorat



