क्राईम न्युज

कदमवाकवस्ती येथे लोखंडी सुरा घेऊन फिरणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात; दुचाकीसह 55 हजारांचा मुद्देमाल जप्त

कदमवाकवस्ती (ता.हवेली) : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर परिसरात दुचाकीच्या डिकीत लोखंडी सुरा घेऊन संशयास्पद हालचाली करणाऱ्या तिघांना लोणी काळभोर पोलिसांनी शनिवारी (ता. 20) पहाटे कारवाई करत अटक केली. आरोपींकडून दुचाकीसह एकूण 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे 

अफसर एहसान अन्सारी (वय 31, रा. इंदिरानगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, पुणे), नदीम महेबुब मुलाणी (वय 23, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली, पुणे), रोहीत सतिश नवगण (वय 26, रा. म्हसोबा मंदिराजवळ, काळेपडळ, हडपसर, पुणे) असून याप्रकरणी पोलीस अंमलदार सुरज कुंभार यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

गस्तीदरम्यान पोलिसांना मिळाला धक्का…

शुक्रवारी (ता. 19) रात्री लोणी काळभोर पोलिसांचे पथक नियमित गस्त घालत होते. त्यावेळी हवालदार रामहरी वणवे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, कदमवाकवस्ती येथील पालखी तळाजवळ तीन संशयित इसम एकाच दुचाकीवर फिरत आहेत. त्यानंतर पोलिसांनी तातडीने छापा टाकला असता हे तिघे आरोपी आढळून आले. तपासणी केली असता, त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या सुझुकी कंपनीच्या दुचाकीच्या डिकीत एक लोखंडी सुरा आढळून आला.

मनाई आदेशाचे उल्लंघन…

दरम्यान, परिसरात कोणतेही शस्त्र, काठ्या, सोटे, तलवारी, दंड, बंदुका किंवा इजा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू जवळ बाळगण्यास मनाई आदेश लागू आहे. मात्र आरोपींनी हा आदेश मोडत बेकायदेशीररित्या शस्त्र जवळ ठेवले होते. याप्रकरणी आरोपींवर भारतीय हत्यार कायदा कलम 4(25), भारतीय न्याय संहिता कलम 3(5) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई…

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद पन्हाळे व निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, हवालदार रामहरी वणवे, तेज भोसले, अंमलदार सुरज कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांचा सहभाग होता.

आरोपींकडून जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 55 हजार रुपये असून पुढील तपास पोलीस हवालदार सर्जेराव धडस करत आहेत.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??