पिडीत महिलेवर दबाव ; अखेर खासदार कोल्हें यांचा फोन, गुन्हा दाखल…
नवरात्रात स्त्रीशक्तीचा अपमान ; दबाव टाकणाऱ्यांना पाठीशी कोण?

लोणी काळभोर (हवेली) : नवरात्री उत्सव हा देशभरात स्त्रीशक्तीच्या पूजनाचा मानला जातो. मात्र, याच काळात लोणी काळभोर परिसरात महिलांच्या सन्मानाला तिलांजली देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्वजनिक उत्सवदरम्यान एका इसमाने उपस्थित महिलेला “तू मला आवडतेस, माझ्यासोबत झोप..?” असे अश्लील बोलून विनयभंग केला. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.
तक्रारीवर दबाव आणण्याचा प्रयत्न…
या घृणास्पद प्रकारानंतर पीडित महिलेने धैर्य दाखवत थेट लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र रात्री उशिरापर्यंत काही स्थानिक नागरिकांनी तक्रार दाखल करू नये म्हणून पीडित महिलेला अडवण्याचा प्रयत्न केला. माझं तुझ्यावर प्रेम आहे. “तु मला आवडती” “तु माझ्या सोबत एक रात्र झोप” तु काही बोललीस तर हातपाय काढीन, अशा धमक्या देत तिला मानसिक त्रास देत. दबाव टाकला. आणि गुन्हा दाखल करायला वेळ गेला. यामुळे पीडितेला या घटनेचा जबर धक्का बसला.
महिला संघटनांचा निषेध..
या प्रकरणाची माहिती पुणे परिसरात वाऱ्यासारखी पसरली. महिलांवर अशा प्रकारे दबाव आणणे आणि आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यास नागरिकांनी तसेच स्थानिक महिला संघटनांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
“नवरात्रीसारख्या पवित्र सणात महिलांचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घालणारे किती संवेदनाहीन आहेत?” असा सवाल नागरिक करत आहेत.
खासदार अमोल कोल्हेंचा तातडीचा हस्तक्षेप…
या गंभीर प्रकरणाची दखल शिरूर-हवेली मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतली. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत गुन्हा त्वरित दाखल करण्याचे आदेश दिले. खासदारांच्या फोननंतर वेगाने सुत्र फिरले. आणि अखेर आरोपीविरुद्ध विलंबाने का होईना गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायासाठी ठाम भूमिका हवी…
या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांत काही अदुश्य शक्ती आरोपींचे रक्षण करताना सरसावल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनाने आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी दबावाखाली न येता ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. स्थानिक महिला संघटनांनी या प्रकरणात कठोर कारवाई व्हावी, आरोपीला अटक करून कायद्याच्या कचाट्यात आणावे, तसेच पीडित महिलेला न्याय मिळवून द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
Editer sunil thorat



