Pune Traffic : हडपसर कडून लोणी काळभोर कडे येणाऱ्या अवजड वाहनांमुळे ‘डायवर्सनची’ ऐंसी की तैंसी…?

पुणे : लोणी काळभोर येथे पुणे शहराकडे अवजड वाहनांना जाण्यासाठी सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत प्रवेश बंदी पूर्णपणे केलेली असून पुणे सोलापूर महामार्गावर सोलापूर वरून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांचे ‘डायवर्सन’ करण्यात आले आहे. सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत प्रवेश बंदी केली आहे
सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत प्रवेश बंदी असताना हडपसर वाहतूक शाखा हद्दीतून लोणी काळभोर कडे अवजड वाहने येतात कशी..संतप्त नागरिकांचा सवाल..?
अवजड वाहने वळतेवेळी हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे ‘डायवर्सन’ मोठ्या प्रमाणावर लोणी काळभोर वाहतूक शाखेला डायवर्सनमुळे ट्राफिकचा सामना करावा लागत आहे व नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत पुणे शहरांमध्ये अवजड वाहनास सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत प्रवेश बंदी असतानाही हडपसर वाहतूक शाखा हद्दीतून लोणी काळभोरच्या दिशेने अवजड वाहने येतातच कशी त्याला आशीर्वाद कुणाचा.? असा सवाल संतप्त नागरिक करताना दिसत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक शाखेचे पोलीस कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्यांच्या जीवीतास धोका…
पुणे सोलापूर महामार्गावर पुणे शहराकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावर कवडीपाट टोलनाका येथे ‘डायवर्सन’ केलेले आहे या ‘डायवर्सन’ मुळे लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवीतास धोका निर्माण झालेला असून अवजड वाहणे अतिशय तीव्र वेगाने येत असतात आणि त्यांचे वेळे ब्रेक लागत नसल्याकारणाने वाहतूक पोलिसांच्या जीवाला धोका असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अवजड वाहनचालक यांचे वारंवार वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांशी वाद होत आहेत कर्मचारी फक्त चार संख्या असल्याकारणाने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण होत आहे. यावर संबंधित वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात हे पाहणे तितकेच महत्त्वाचे राहणार आहे.
पुणे शहरात अवजड वाहनांना सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत प्रवेश बंदी तरीही हडपसर मधून लोणी काळभोर कडे अवजड वाहने येतातच कशी..
पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा यांच्या आदेशानुसार पुणे शहरांमध्ये अवजड वाहनांना सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत प्रवेश बंदी पूर्णपणे बंद केलेली आहे ही अवजड वाहने सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत प्रवेश बंदी असतानाही हडपसर वाहतूक शाखा हद्दीतून लोणी काळभोरच्या दिशेने येत असल्याकारणाने लोणी काळभोर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. व हडपसर वाहतूक शाखा अवजड वाहनांवरती कशाप्रकारे नियंत्रण करणार व काय नियोजन करणार जेणेकरून लोणी काळभोरला चक्काजाम होणार नाही हे आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे व संबंधित वरिष्ठ अधिकारी हडपसर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार. .? काय उपाययोजना करणार..? हे येणाऱ्या काळातच आपल्याला पाहायला मिळणार आहे.
हडपसर वाहतूक शाखा अवजड वाहनांवर कोणतीही कारवाई करत नाही.. पहा व्हिडिओ..





