क्राईम न्युज

लिफ्टच्या बहाण्याने महिलेला झुडपात नेऊन अत्याचार; १०० CCTV तपासून आरोपीला भिगवण पोलिसांनी पकडलं!

डॉ

भिगवण : पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने परिसर हादरला आहे. १० सप्टेंबर रोजी मध्यरात्री एका महिलेला दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने झाडाझुडपात नेऊन अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी जाक्या चव्हाण (रा. माळवाडी लिंगाळी, ता. दौंड) या आरोपीला अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्यानंतर पलायन करून पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांच्या सहा पथकांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने आरोपीचा ठावठिकाणा शोधला व त्याला गजाआड केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेला दुचाकीवर लिफ्ट देण्याचा बहाणा करून मळद गावाजवळील रेल्वे ब्रिज परिसरात नेले. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत झाडाझुडपात नेऊन अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीनंतर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. आरोपीचा शोध घेण्यासाठी दौंड व स्थानिक गुन्हे शाखेची सहा विशेष पथके तयार करण्यात आली होती.

या संपूर्ण कारवाईत पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश बोपडे, उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास पूर्ण केला.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, अमित पाटील, तसेच अंमलदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, अमीर शेख, महेश उगले, सचिन पवार, संतोष मखरे आणि कुलदीप संपकाळ यांनी मोलाची भूमिका बजावली.

दरम्यान, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड करीत आहेत. पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??