
आंधळगाव : फुलगाव (ता. हवेली) येथे मंगळवारी (दि. २०) पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण जिल्हास्तरीय कला-क्रीडा स्पर्धेत शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई शाळेच्या लहान गटातील मुले व मुलींनी ‘खो-खो’ स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत दणदणीत यश मिळवले. एकाच स्पर्धेत मुला-मुलींचे दुहेरी विजेतेपद मिळवण्याची उल्लेखनीय कामगिरी वडगाव रासाईने साध्य केली.
लहान गट मुले खो-खो स्पर्धेत वडगाव रासाईच्या संघाने अत्यंत चुरशीच्या सामन्यात हवेली तालुक्याच्या बलाढ्य संघावर मात करत विजेतेपद मिळवले. तर लहान गट मुली खो-खो स्पर्धेतही वडगाव रासाईच्या संघाने सुरुवातीपासूनच दमदार खेळ सादर करत प्रतिस्पर्धी संघांना संधी न देता प्रथम क्रमांक पटकावला.
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकवर्गाने घेतलेला सातत्यपूर्ण सराव मोलाचा ठरला. तसेच वडगाव रासाईचे केंद्रप्रमुख दगडू वेताळ, न्हावरे बीटचे विस्तार अधिकारी सुनार्थ पवार, शिरूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वीरेंद्र ढवळे, उपाध्यक्ष वैशाली चांदगुडे व सदस्य, तसेच माता-विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व समिती यांनी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला. या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व पालकांचे सर्वत्र अभिनंदउपाध्यक्ष.
Editer sunil thorat



