भविष्यात भाई होणार नाहीत जर झाले तर आम्ही अशी अवस्था करु ; मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक… पहा व्हिडिओ…

पुणे (हडपसर) : काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सय्यद नगर भागात दहशत असल्याने सय्यदनगर ठिकाणी त्यांची पायी धिंड काढली असून सय्यदनगर भागातील नागरिकांना टिपू पठाण व त्याचे साथीदाराने विरुद्ध तक्रार देण्याचे जाहीर आवाहन भर चौकात केले.
काळेपडळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 100/ 2025 भारतीय न्याय संहिता 389 , 61 (2) व इतर मधील अटक आरोपी १) रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण,२) सद्दाम सलीम पठाण, ३)एजाज युसूफ इनामदार, ४) नदीम बाबर खान यांना दाखल गुन्ह्याचे तपासकामी गुन्ह्याचे घटनास्थळ सर्वे नंबर 75 / 6 हडपसर, पुणे येथे तपासासाठी ताब्यात घेण्यात आले.
तसेच आरोपींची सय्यद नगर भागात दहशत असल्याने सदर ठिकाणी त्यांची पायी धिंड काढली असून सय्यदनगर भागातील नागरिकांना टिपू पठाण व त्याचे साथीदार यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे जाहीर आवाहन केलेले आहे.
मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस ठाणे पुढे आवाहन करताना असे म्हणाले की खंडणी, धमकी कोणाला दिली असेल तर नागरिकांनी न घाबरता तक्रार करावी. तक्रार करणार्या नागरिकांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल व पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी आहे. याबाबत आमच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी तक्रार केली तरी चालेल. नाव गुप्त ठेवण्यात येईल भविष्यात असे भाई होणार नाहीत, जर झालेच तर त्यांची आम्ही अशी अवस्था करु असे आवाहन करताना म्हणाले..



