क्राईम न्युज

भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू ; ओळख पटत नसल्याने लोणी काळभोर पोलिसांचे नागरिकांना आव्हान…

तुळशीराम घुसाळकर / हवेली

पुणे (हवेली) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात शुक्रवारी (ता.२४) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

या अपघातात मृत्यू झालेल्या अनोळखी इसमाची दोन दिवस होऊन देखील अद्याप ओळख पटलेली नसल्याने. त्या इसमाची ओळख पडण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांसमोर आवाहन आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार केतन धेंडे यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम, 281,106 (1), सह मोटार वाहन कायदा कलम 119/177, 134,184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी इसम हा रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडत होता. तेव्हा सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने भरधाव चाललेल्या अज्ञात वाहनाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात जोरदार धडक दिली. त्यावेळी अज्ञात वाहन व चालक घटना स्थळावरून पळून गेला.

या अपघातात अनोळखी इसम गंभीर जखमी झाला होता. नागरिकांनी त्वरित ॲम्ब्युलन्सला फोन करून या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. सदर घटनेची माहिती मिळताच ॲम्ब्युलन्स व लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमीला ॲम्ब्युलन्समधून उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवले. अनोळखी इसमाला रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.

याप्रकरणी पोलीस हवालदार केतन धेंडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी इसमास गाडीने जबर ठोस मारून, गंभीर जखमी करून, त्याच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करीत आहेत.

पोलिसांशी संपर्क साधावा : वरिष्ठ पोलीस राजेंद्र पन्हाळे

अपघातात मृत्यू झालेल्या अनोळखी इसमाचे वय – ३०, उंची १७० से.मी. रंग- सावळा, केस- काळे वाढलेले, नाक मोठे लांब, दाढी वाढलेली, शरीर बांधा मजबुत, अंगात पिवळ्या रंगाचा हुडी असलेला टी शर्ट आहे. अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे काम लोणी काळभोर पोलिस करीत असून या अनोळखी इसामाबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे 020-29995260 किंवा पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार – 9421444455 यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??