ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी…

पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीचा जाहीर प्रचार दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता समाप्त होणार असून, त्यानंतर कोणत्याही स्वरूपाच्या प्रचाराच्या जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. तसेच मतदानाच्या दिवशी म्हणजे दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुद्रित माध्यमांसह इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमांमध्येही जाहिराती प्रसिद्ध करण्यास बंदी असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील कलम २८-ब (१) नुसार मतदानास सुरुवात होण्यापूर्वीच्या चोवीस तासांच्या कालावधीत कोणतीही सार्वजनिक सभा बोलावणे, भरविणे किंवा अशा सभेत सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मतदानाच्या दिवशी संबंधित मतदार विभागात कोणत्याही प्रकारचा जाहीर प्रचार करता येणार नाही.

राज्य निवडणूक आयोगाने दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रामाणन आदेश, २०२५’ प्रसिद्ध केला आहे. या आदेशाच्या भाग आठमधील परिच्छेद १६ (घ) नुसार प्रचाराची मुदत संपल्यानंतर तसेच मतदानाच्या दिवशी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व समाज माध्यमांमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रचाराच्या जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत.
तसेच या आदेशाच्या परिच्छेद १६ (ग) नुसार दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता प्रचाराचा कालावधी संपेल. त्यानंतर प्रचारसभा, प्रचारफेऱ्या, ध्वनिक्षेपकांचा वापर तसेच अन्य कोणत्याही माध्यमातून जाहीर प्रचार करण्यास पूर्णतः बंदी राहील, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व नियमांनुसार पार पडावी यासाठी सर्व उमेदवार, राजकीय पक्ष, माध्यम प्रतिनिधी व नागरिकांनी निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??